Breaking

किरकोळ कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला; गंभीर जखमी

Updated: नोव्हेंबर 6, 2025

By Vivek Sindhu

किरकोळ कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला; गंभीर जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

किल्लेधारूर -धारूर शहरात किरकोळ कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ६) घडली. या हल्ल्यात पानटपरी चालक हनुमंत शिवाजी फावडे (वय २७, रा. गायकवाड गल्ली) गंभीर जखमी झाला आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात अज्ञात व्यक्तीने फावडे यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.जखमी फावडे यांना तात्काळ धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच धारूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वागमोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपीचा शोध सुरू आहे.

Categories

Recent Posts