Breaking
Updated: नोव्हेंबर 5, 2025
युवकास लोखंडी रॉडने मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelचौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
केज – मुलीला मॅसेज केल्याच्या कारणावरून एका १७ वर्षीय युवकास दुचाकीवर बसवून शेतात नेऊन जातीवाचक शिवीगाळ करून चापटाबुक्क्याने व लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केल्याची घटना एकुरका (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
एकुरका येथील उमेश अशोक कोकाटे (वय १७) या युवकास ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सचिन अभिमान मोरे व गणेश तुळशीराम मोरे या दोघांनी तुझे वडील आमच्या शेतात आहेत, असे सांगून दुचाकीवर बसवून शेतात नेले. त्याठिकाणी या दोघांसह त्यांचे वडील अभिमान मोरे व तुळशीराम मोरे या चौघांनी तु मुलीला मेसेज का केला, असे म्हणत त्याला माफी मागायला लावून माफी मागताना त्यांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग केले. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करून चप्पल, चापटाबुक्क्याने व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. अशी तक्रार उमेश कोकाटे याने दिल्यावरून सचिन मोरे, गणेश मोरे, अभिमान मोरे, तुळशीराम मोरे या चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री वेंकटराम हे करीत आहेत.