Breaking
Updated: ऑक्टोबर 31, 2025
शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्याच्या मागणीला यश - ऋषिकेश गलांडे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – यावर्षी सोयाबीन विक्री हंगाम सुरु होऊन अनेक दिवस उलटले परंतु झोपलेल्या सरकारने खरेदी केंद्राबाबात कोणतेही निर्णय घेतले नाहीत. सोयाबीन ला 5328 रु प्रति क्विंटल हमीभाव देऊन ही 3500 रुपये किमतीने खासगी खरेदी केंद्रात भाव दिल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट चालू होती म्हणून दिनांक 18 ऑक्टोबर रोजी केज तहसीलदार यांना सर्व शेतकरी पुत्रांच्या वतीने निवेदन देऊन कळवण्यात आले होते की खासगी खरेदी केंद्रात मोठ्या प्रमाणात लूट होत आहे अगोदरचं अतिवृष्टी मुळे उत्पादन कमी झाले लवकरात लवकर शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे परंतु 28 ऑक्टोबर पर्यंत कोणतीही प्रक्रिया झाली नाही त्यानंतर चिंचोली माळी परिसरातील सर्व शेतकरी व शेतकरी पुत्रांनी 28 ऑक्टोबर ला प्रशासना ला आवाहन देत 3 नोव्हेंबर रोजी चिंचोली माळी फाटा केज – कळंब रस्ता रोको चे आंदोलन पुकारले होते, याचीच दखल प्रशासनाने घेऊन 15 नोव्हेंबर पासून शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला व प्रशासनाकडून लेखी आल्यामुळे सर्वानुमते हे आंदोलन आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेत असल्याचे ऋषीकेश गलांडे यांनी सांगितले. 15 नोव्हेंबर रोजी जर खरेदी केंद्र सुरु झाले नाहीत तर त्याच दिवशी आंदोलनाला सुरवात करण्यात येईल. असा ईशारा ही त्यांनी दिला आहे.