Breaking

केजमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दलाल अटकेत, पिडीतेची मुक्तता

Updated: ऑक्टोबर 30, 2025

By Vivek Sindhu

केजमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दलाल अटकेत, पिडीतेची मुक्तता

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : धारुर रोडवरील भवानीनगर परिसरात चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर केज पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकत दलालाला रंगेहाथ पकडले. या कारवाईत एक पिडीत महिलेला मुक्त करण्यात आले असून, आरोपीविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई दि. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 2 वाजता करण्यात आली. केज ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उमेश ज्ञानेश्वर निकम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मारुती भिवाजी चाटे (रा. तांबवा, ता. केज) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केज मधील भवानीमाळ, धारुर रोड येथील घरात महिलांना बोलावून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक, बीड यांच्या आदेशानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्यासह महिला पोलीस पथक केज येथे दाखल झाले. दोन पंच आणि एक डमी ग्राहक यांना सोबत घेऊन सापळा रचण्यात आला. डमी ग्राहकास आरोपीच्या घरात पाठविण्यात आले. ठरल्याप्रमाणे डमी ग्राहकाने इशारा दिल्यानंतर ४ वाजता पोलिसांनी छापा मारला. यावेळी आरोपी मारुती भिवाजी चाटे यास पकडले असता, त्याच्याकडे डमी ग्राहकाला दिलेली १,२०० रुपयांची रक्कम मिळून आली.

घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पोलीसांनी तपास केला असता, तिथे एक पिडीत महिला आणि डमी ग्राहक मिळाले. सदर महिलेकडे विचारपूस केली असता तिने सांगितले की, ती मूळ धाराशिव जिल्ह्यातील असून आरोपी मारुती चाटे याने तिला केज येथे बोलावून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले असून प्रत्येक ग्राहकाकडून १,२०० रुपये घेतले जातात, त्यापैकी ७०० रुपये तिला दिले जातात आणि ५०० रुपये आरोपी स्वतः घेतो. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पीएसआय उमेश निकम करीत आहेत.

सदर कारवाईत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, पो.नि. स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. पल्लवी जाधव, पोह. अहंकारे, दगडखैर, प्रदीप येवले, अशोक शिंदे व चालक योगेश निर्धार यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी परिसरातील नागरिकांना अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.


Categories

Recent Posts