Breaking

शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

Updated: ऑक्टोबर 29, 2025

By Vivek Sindhu

शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने हवालदिल झालेल्या तरूण शेतकऱ्याने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२८) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास लाडेवडगाव (ता. केज) येथे घडली. सुर्यकांत व्यंकटी शेप (वय ४२) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
लाडेवडगाव येथील सुर्यकांत शेप हा तरूण शेतकरी आपल्या एक-दीड एकर शेती व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, या चिंतेने आलेल्या नैराश्यातून सुर्यकांतने राहत्या घरी विष प्राशन केले. काही वेळाने आई बाहेरून घरी आली असता मुलाने विष प्राशन केल्याचे दिसून आल्याने मदतीसाठी आरडाओरडा केली. ओरडण्याचा आवाज ऐकून मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी खाजगी वाहनातून त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले. मृतदेहाच्या उच्चस्तरीय तपासणीनंतर रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शेतकऱ्याच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन मुली व दोन मुले असा परिवार आहे. एकुलता एक असणारा कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे.


Categories

Recent Posts