Breaking
Updated: ऑक्टोबर 13, 2025
मुंबईच्या प्रशांत गाडेंचा मदतीचा हात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमुंबईच्या प्रशांत गाडेंचा मदतीचा हात
केज – अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे मांजरा नदी काठी असलेल्या इस्थळ (ता. केज) येथील पूरग्रस्त ६० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, किराणा किटचे वाटप करीत मुंबईच्या प्रशांत गाडे यांनी मदतीचा हात पुढे करीत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून पूरपरिस्थितीमुळे मांजरा नदी काठी असलेल्या इस्थळ (ता. केज) येथील कुटुंबाचे स्थलांतर करावे लागले होते. त्यामुळे आपण समाजाचे काही देणं लागतो, आपल्या घासातला घास आपण इतरांना दिला पाहिजे या भावनेतून मुंबई येथील प्रशांत गाडे यांनी इस्थळ येथील पूरग्रस्त ६० कुटुंबांना ब्लँकेट, चादरी, अन्न धान्य, तेल, बिस्किटे, फरसाण, चटणी, गृहउपयोगी वस्तू, औषधे व खाद्य पदार्थ वाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यावेळी शिवप्रसाद ठोंबरे, अभिषेक भिसे, राहुल ठोंबरे, बप्पा भिसे, राम काळे, प्रदीप ठोंबरे, पोपट लांडगे, राजाभाऊ इटकर, अण्णा शेळके, विक्रम चोंदे, आकाश फरके, शशिकांत काळे, वैभव काळे, विलास शिनगारे, राहुल इंगळे, विशाल यादव, नितीन काळे हे उपस्थित होते.