Breaking

घाटनांदुरातून १२ किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Updated: ऑक्टोबर 8, 2025

By Vivek Sindhu

घाटनांदूर येथे १२ किलो गांजा जप्त, एकाला अटक

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: तालुक्यातील घाटनांदुर येथे गावात अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी मोठी कारवाई करत १२ किलो १८६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत २ लाख ४३ हजार ७२० रुपये इतकी आहे. या घटनेमुळे घाटनंदुरात खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. ७ ऑक्टोबर) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. आरोपी निहाल रामभाऊ गंगणे (वय ३०, रा. मोंढा विभाग, रेल्वे पटरी जवळ, घाटनांदुर) हा आपल्या घरामध्ये अवैधरित्या गांजाचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.

त्याच्या घरावर छापा मारला असता, घरातून प्लास्टिकच्या पाच पिशव्यांमध्ये एकूण १२ किलो १८६ ग्रॅम वजनाचा गांजा लपवून ठेवलेला आढळला. सदर गांजाची पंचासमक्ष पंचनामा करून जप्ती करण्यात आली. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ नियंत्रण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. या पथकामध्ये रामचंद्र केकान, गोविंद राख, बाळू सानप, दिलीप गिते, भताने तसेच अंबाजोगाई ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले, सफौ मुंडे, पोह देशमाने, मपोह थोरात, पोअ सोळंके आदींचा समावेश होता.

दरम्यान, जप्त केलेला गांजा फॉरेन्सिक टीम बीडमार्फत सीलबंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले करत आहेत.


Categories

Recent Posts