Breaking
Updated: ऑक्टोबर 2, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, डाव्या चळवळीचे प्रमुख शिलेदार आणि बीड जिल्ह्याचे माजी खासदार कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन येत्या शुक्रवारी, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र विद्यालय, मोहा येथे करण्यात आले आहे.
कॉ. बुरांडे यांच्या तत्त्वनिष्ठ त्यागमय जीवनमूल्यांमुळे त्यांची ओळख जनसेवक, शोषित-वंचितांच्या हक्कासाठी लढणारे, प्रगल्भ डावी विचारसरणी स्वीकारलेले समाजकार्यकर्ते म्हणून झाली. त्यांनी आपल्या कार्यातून शेतकरी, शेतमजूर, दलित, वंचित समाजघटकांना संघटित करण्याचे मोठे काम केले. त्यांच्या स्मृतीतून ओतप्रोत झालेली प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीच या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. उमेश देशमुख, महाराष्ट्र राज्याध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा हे असतील. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रनेते व माजी खासदार कॉ. वृंदा कारात, कम्युनिस्ट पक्ष या व्याख्यानमालेस मार्गदर्शन करणार आहेत.
कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान, अंबाजोगाई, महाराष्ट्र शिक्षण संस्था व ग्रामस्थ मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम महाराष्ट्र विद्यालय मोहा, ता. परळी वैजनाथ येथे शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. होणार आहे. समाजातील प्रबुद्ध नागरिक, शेतकरी, तरुणाई, शिक्षक, महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.