Home »
Kaij » तलावाचा सांडवा फोडल्याने जोला गावावरील संकट टळले
तलावाचा सांडवा फोडल्याने जोला गावावरील संकट टळले
Updated: सप्टेंबर 29, 2025
तलाठ्याची दाखविली तत्परता
तलाठ्याची दाखविली तत्परता
केज – केज तालुक्यातील जोला शिवारातील रक्ताळीचा माळ परिसरातील पाझर तलाव पावसाने तुडुंब भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहत होते. मात्र तलाव फुटण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तलाठ्याने तत्परता दाखवून जेसीबीच्या मदतीने सांडवा फोडून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने या गावावरील संकट टळले.
केज तालुक्यात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आले. तर ओव्हरफ्लो झालेल्या तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात जोला गावातील रक्ताळीचा माळ शेतातील पाझर तलाव तुडुंब भरून फुटण्याच्या मार्गावर असल्याचे निदर्शनास येताच गोविंद ढाकणे, भगवान करंजकर, आसाराम ढाकणे यांनी जोला सज्जाचे तलाठी तलाठी रविंद्र गायकवाड यांना माहिती दिली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने सुरुवातीला टिकवाने सांडवा फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने सात तास मशिन चालवून सांडवा खोल करून घेतला आणि विसर्ग वाढविला. तलाठी रविंद्र गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे गावावरील संकट टळले.
दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे तलाव तुडुंब भरून भिंतींवरुन पाणी वाहत होते. तलाठी यांनी गावकऱ्यांच्या मदतीने सांडवा फोडून घेतल्याने होणारे नुकसान टळले.
बाजीराव ढाकणे
ग्रामस्थ, जोला.