Breaking

एकाच रात्री चार घर फोडले, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Updated: सप्टेंबर 28, 2025

By Vivek Sindhu

एकाच रात्री चार घर फोडले, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज शहरातील शिक्षक कॉलनी भागात चोरट्यांनी शेजारच्या रूमच्या बाहेरून कड्या लावून बंद असलेली चार घरे फोडून लॅपटॉप, नगदी रक्कम, पितळी भांडे असा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास घडली.

केज शहरातील शिक्षक कॉलनी हा भाग मांजरसुंबा रस्त्यालगत येत असून मध्यरात्री सुरू असलेल्या फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भाजपचे नेते दत्ता धस यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या किरायादारांच्या घरांना बाहेरून कड्या लावून घेत धस यांच्या रुममध्ये ड्रॉवरमध्ये ठेवलेले लॅपटॉप चोरून नेला.

त्यांचे शेजारी ठोंबरे यांच्याकडे किरायदार म्हणून राहत असलेल्या मनीषा ससाणे या बाहेरगावी असल्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ससाणे यांच्या घरातील दिवाणमध्ये ठेवलेले रोख दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरट्यांनी शिवाजी घुले यांच्या घरातील कॅमेरा व पितळाची भांडे व रोख रक्कम चोरून नेली.

तर अनंत घुले यांच्या घरातही चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केली. मात्र ते गावाकडे असल्याने घरातील कोणता मुद्देमाल चोरीला गेला हे स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.


Categories

Recent Posts