Breaking

मस्साजोग येथे ३४ लाख ४६ हजाराचा गुटखा पकडला

Updated: सप्टेंबर 26, 2025

By Vivek Sindhu

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; दोघांवर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; दोघांवर गुन्हा

केज – केज तालुक्यातील मस्साजोग शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ३४ लाख ४६ हजार २७० रुपयांचा विविध प्रकारचा गुटखा व सुगंधी तंबाखू पकडला असून एक जीप ही जप्त केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मस्साजोग येथील रोहित आसाराम देशमुख याच्या शिवारातील शेतवस्तीवर रोहित देशमुख व आंधळेवाडी (ता. केज) येथील साहेबराव लिंबा आंधळे या दोघांनी गुटख्याचा साठा करून ठेवल्याची गुप्त स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली. त्यावरून पथकाने शुक्रवारी (दि. २६) पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास छापा मारून १६ लाख ३ हजार ५६० रुपयांचा विमल पान मसाला, ९ लाख ४५ हजार रुपयांचा राजनिवास पान मसाला, २ लाख १६ हजार रुपयांचा गोवा गुटखा, १ लाख ७८ हजार ७५० रुपयांचा बाबाजी पान मसाला, १ लाख २ हजार ९६० हिरा पान मसाला व ४ लाख रुपयांची मॅक्स जीप (एम. एच. ४४ यु. ३५०९) असा ३४ लाख ४६ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे जमादार आनंद मस्के यांच्या फिर्यादीवरून रोहित देशमुख, साहेबराव आंधळे या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनात फौजदार उमेश निकम हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts