Breaking

धारूर घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार, एक गंभीर जखमी

Updated: सप्टेंबर 22, 2025

By Vivek Sindhu

तलवाड्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर : धारूर घाटातील अपघातांची मालिका सुरूच असून, आज पुन्हा एकदा टेम्पो आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार मुंजाभाऊ धर्मराज सोळुंके (रा. मुंगी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले रमेश मोरे गंभीर जखमी झाले आहेत.

आज सकाळच्या सुमारास कोळपिंपरी येथील जाधव यांचा टेम्पो माजलगावच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेत दुचाकीवरील सोळुंके यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या रमेश मोरे यांना प्रथम धारूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून धारूर घाटातील रस्त्यांची दुरवस्था कायम असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.


Categories

Recent Posts