Breaking

ग्रामसभेत तक्रार केल्याच्या रागातून मारहाण

Updated: सप्टेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

ग्रामसभेत तक्रार केल्याच्या रागातून मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारुर : घराच्या जागेच्या वादातून नातलगांमध्ये रस्त्यावर उघड मारहाण झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता काटेवाडी येथे घडली. यात एका तरुणाला दगडाने मारून गंभीर जखमी करण्यात आले असून महिलांनाही मारहाण झाल्याचे समोर आले आहे.

संतोष दामोदर गोरे (वय ३०, व्यवसाय मजुरी, रा. काटेवाडी, ता. धारुर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, आरोपी भास्कर अश्रुबा शेळकर उर्फ शेळके, सुनिता भास्कर शेळकर उर्फ शेळके आणि अश्रुबा कोंडीबा शेळकर उर्फ शेळके (सर्व रा. काटेवाडी) यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून घराच्या जागेवरून वाद सुरू आहे.

फिर्यादी आपल्या भावासोबत पांडुरंग संभाजी गोरे यांच्या घरासमोर बोलत असताना आरोपी तेथे आले. आरोपी भास्कर शेळकर याने “१७ सप्टेंबरला ग्रामसभेत आमची तक्रार का केलीस?” या कारणावरून फिर्यादीस व त्यांच्या भावास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी अश्रुबा शेळकर याने हातातील दगड फिर्यादीच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले. दरम्यान भांडण सोडविण्यास आलेल्या फिर्यादीची आई व भावजई यांनाही सुनिता शेळकर हिने केसाला धरून खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणी दरम्यान सर्व आरोपींनी फिर्यादी व कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह. मुंडे करीत आहेत.


Categories

Recent Posts