Breaking

गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Updated: सप्टेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – एका अल्पवयीन मुलीसह तिच्या सोबत असलेल्या महिलेस चहापाणी नाष्टा करू अशी थाप मारून गटशिक्षणाधिकाऱ्याने त्यांना कारमध्ये बसवून नेत निर्जनस्थळी नेऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी व तिच्यासोबत असलेल्या महिलेस केज येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याने १८ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास चहापाणी व नाष्टा करू असे म्हणून कारमध्ये बसवून धारूर चौकातून चिंचपूर मारुती मंदिराच्या रस्त्याने नेले. तेथून कोल्हेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला नेऊन अल्पवयीन मुलीच्या हाताला धरून विनयभंग केला. त्यांनी आरडाओरडा सुरू केल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तेवढ्यात तिकडे दुसरी कार येत असल्याचे पाहून लक्ष्मण बेडसकर हा कारमधून उतरून पळून गेला. अशी तक्रार पीडित मुलीने दिल्यावरून लक्ष्मण बेडसकरविरुद्ध केज पोलिसात गु. र. न. ५०९/२०२५ कलम ७४, ७५ (१) (२), ३५१ (२), भा. न्या. सं. सह कलम ८ बाल अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके हे करीत आहेत.

गुन्हा दाखल होण्यापूर्वी बेडसकरचा पोलिसात अर्ज

गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार घेतल्यापासून शिक्षण विस्तार अधिकारी डी. एम. चाटे, एस. एस. केंद्रे हे त्रास देण्याच्या उद्देशाने कटकारस्थान करीत असून धारूरचे कार्यकर्ते सादिक इनामदार हे पदभार काढून घेण्यासाठी तक्रारी करीत आहेत. तर १८ सप्टेंबर रोजी रात्री ७.३० वाजता विश्रामगृहाच्या बाजूस भेटलेली महिला व दोन मुलींनी काही खास बोलायचे आहे असे सांगून कारमध्ये बसून रुपेश कोल्हे शेतापर्यंत नेले. त्याठिकाणी पाठीमागून जीपमध्ये तोंड बांधून आलेल्या चार ते पाच लोकांनी दमदाटी करीत मोबाईल, पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड काढून घेतले. बलात्कार व विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. पत्नीच्या मोबाईलवर दीपक थोरातचा भाऊ बोलतोय असे सांगून हे प्रकरण मिटवण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. वरील लोकांपासून जीवितास धोका असल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, असा लेखी अर्ज लक्ष्मण बेडसकर याने त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याच्या अगोदर केज पोलीस ठाण्यात दिला होता.


Categories

Recent Posts