Breaking
Updated: सप्टेंबर 20, 2025
विद्युत तार तुटून पडल्याने ऊस पिकाचे नुकसान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज तालुक्यातील सारूकवाडी शिवारात शेतातून गेलेली ११ केव्ही विद्युत वाहिनीची पोलवरील तार तुटून पडल्याने उसाच्या पिकात पडली. त्यामुळे ऊस जळून नुकसान झाले आहे. मात्र त्या अगोदर पाऊस पडला होता, म्हणून मोठे नुकसान टळले आहे. जुन्या व लोंबकळत असलेल्या तारा बदलण्याची मागणी करून ही महावितरणकडून हलगर्जीपणा झाल्याचे शेतकरी जयदत्त कल्याणराव गलांडे यांचे म्हणणे आहे.
चिंचोलीमाळी (ता. केज) येथील शेतकरी जयदत्त कल्याणराव गलांडे यांनी सारूकवाडी शिवारात स.नं.१ मधील जमिनीत पाच एकर उसाचे पीक घेतले आहे. या उसाच्या पिकातून वीज वितरण कंपनीच्या ११ केव्हीच्या दोन वाहिनीच्या तारा गेल्या असून त्या तारा जुन्या व जीर्ण झालेल्या व लोंबकळत असल्याने वाऱ्याने तारा उसाच्या पनाट्यात आडकत होत्या. त्यामुळे त्यांनी वारंवार मागणी करून विद्युत महावितरणकडून टाळाटाळ केली. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान ११ केव्हीची तार तुटून ऊस पिकांमध्ये ऊस जळाला आहे. मात्र दोन तासापूर्वी पाऊस पडल्याने मोठे नुकसान टळले. या घटनेनंतर मंडळ अधिकारी मस्के यांनी पंचनामा करून भविष्यात सदर विद्युत तारेमुळे वित्त व जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदर विद्युत तारेस गार्ड बसविणे आवश्यक आहे. असा अहवाल तहसीलदारांकडे सादर केला आहे. नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी जयदत्त गलांडे यांनी केली आहे.