Breaking

केज शहरातून शाळकरी मुलाचे अपहरण

Updated: सप्टेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

केज शहरातून शाळकरी मुलाचे अपहरण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला १३ वर्षीय मुलगा वस्तीगृहातून बाहेर पडल्यानंतर त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना केज शहरात १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.
माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव येथील रोहित विजय चव्हाण (वय १३) हा केज शहरातील रामराव पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तर तो शहरात तांबवेश्वर मुलांचे गुरुकुल वस्तीगृहात वास्तव्यास होता. मागील आठवड्यात तो गावाकडे गेल्यानंतर परत वसतिगृहात जाण्यास नकार देऊ लागल्याने त्याचे वडील विजय चव्हाण व आई संगीता चव्हाण हे त्याला तुळजापुरला दर्शनासाठी घेऊन गेले. त्यानंतर परत जाताना १८ सप्टेंबर रोजी ४.३० वाजता या वस्तीगृहावर सोडून गेले. सायंकाळी ६.३० वाजता रोहित चव्हाण हा कोणाला ही न सांगता वस्तीगृहातून बाहेर पडला. तो परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्याचा तपास न लागल्याने त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार विजय चव्हाण यांनी केज ठाण्यात दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे करीत आहेत.
दरम्यान, तो मागे दोन – तीन वेळा असा पळून गेल्याने व तो वसतिगृहात राहत नसल्याने त्याच्या वडिलांनी हमीपत्र देऊन त्याला सोडले होते. त्याचा रंग सावळा असून अंगाने सडपातळ आहे. उंची तीन फुट आठ इंच असून अंगावर पांढऱ्या व काळ्या रंगाचे मोठे चेक्स असलेले शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट आहे. अशा वर्णनाचा मुलगा आढळून आल्यास केज ठाण्याशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस नाईक त्रिंबक सोपणे यांनी केले आहे.


Categories

Recent Posts