Breaking
Updated: सप्टेंबर 20, 2025
केजमध्ये आडत व्यापाऱ्याची आत्महत्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज : आजारास कंटाळून एका ६२ वर्षीय आडत व्यापाऱ्याने घराच्या तळमजल्यात लोखंडी आडूला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना केज शहरातील नवामोंढा भागात शुक्रवारी (दि. १९) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. राधेशाम श्रीराम तोष्णीवाल असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
केज शहरातील नवामोंढा परिसरात प्रसिद्ध आडत व्यापारी राधेशाम श्रीराम तोष्णीवाल (वय ६२) यांची आडत व त्याठिकाणी राहते घर आहे. त्यांनी आजारास कंटाळून टोकाची भूमिका घेत शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घराच्या तळमजल्यात लोखंडी आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच फौजदार सुकुमार बनसोडे, जमादार दत्तात्रय बिक्कड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनात जमादार दत्तात्रय बिक्कड हे पुढील तपास करीत आहेत.