Breaking

देवगावात उसने दिलेल्या पैशाच्या वादातून दोन्ही गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Updated: सप्टेंबर 18, 2025

By Vivek Sindhu

एएसपी चेतना तिडके यांच्या निदर्शनास आला प्रकार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : तालुक्यातील देवगाव शिवारात उसने दिलेल्या पैशाच्या वादातून दोन गटांत हाणामारी होऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 16 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी घडली.

सुनिल सुभाष मुंडे (वय 27, रा. देवगाव) यांच्या फिर्यादीनुसार ते मोटारसायकलवरून जात असताना आरोपी रामदास जगन्नाथ मुंडे, रामहारी सुंदर मुंडे, विष्णु ज्योतीराम मुंडे व चार अनोळखी इसमांनी त्यांना थांबवून उसने दिलेल्या पैशावरून वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर सर्वांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी रामदास मुंडे याने सत्तूरने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. हात आडवा घातल्याने सुनिल मुंडे जखमी झाले. पुढे पैसे मागितल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तर दुसऱ्या रामदास जगन्नाथ मुंडे (वय 43, रा. देवगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या मोटारसायकलवरून जात असताना लिंबाजी विश्वनाथ घुगे (रा. बोरडी) तसेच विठ्ठल आप्पासाव मुंडे, विजय आप्पासाव मुंडे, गणेश सुभास मुंडे, पांडुरंग रामा मुंडे, सतिश काशिनाथ मुंडे, लालासाहेब रामकिसन मुंडे (सर्व रा. देवगाव) यांनी दोन स्कॉर्पिओमधून येऊन त्यांना अडवले. आरोपींनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले, नकार दिल्यावर शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यातील काही आरोपींनी लोखंडी रॉडने व मुक्क्यांनी वार करून डोळ्याजवळ व नाकावर दुखापत केली. तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यास गाडीने चिरडून टाकू अशी धमकी दिली. या प्रकरणीही केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

घटनेत दोन्ही बाजूंच्या फिर्यादींनी एकमेकांविरुद्ध तक्रार दिल्याने केज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.


Categories

Recent Posts