Breaking

सर्पदंशाने पहिलीत शिकणाऱ्या आठ वर्षीय मुलीचा मृत्यू

Updated: सप्टेंबर 17, 2025

By Vivek Sindhu

सर्पदंशाने पहिलीत शिकणाऱ्या आठ वर्षीय मुलीचा मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

किल्लेधारुर – तालुक्यातील पहाडी दहीफळ येथे सर्पदंशामुळे एका चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (दि.१६) रोजी समोर आली. ज्ञानेश्वरी हरीभाऊ नागरगोजे (वय ८) असे मृत मुलीचे नाव आहे. ज्ञानेश्वरी ही पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होती. अचानक झालेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

सोमवारी पहाटेच्या सुमारास ज्ञानेश्वरी ही आपल्या शेतातील घरात झोपलेली असताना विषारी सर्पाने तिच्या अंगावर डंख केला. काही वेळानंतर मुलगी वेदनेने तडफडू लागल्याने कुटुंबीयांच्या लक्षात प्रकार आला. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने तिला वडवणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

रुग्णवाहिकेतून बीडकडे नेत असताना मार्गातच तिची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेने नागरगोजे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


Categories

Recent Posts