Breaking
Updated: सप्टेंबर 16, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी : साईनगर रोडवर शिक्षकावर अनोळखी तिघांनी विनाकारण चाकूने हल्ला करून जखमी केले. ही घटना दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते ७.३० या वेळेत घडली.
फिर्यादी शिक्षक सम्राट विजयकुमार गंडले (रा. मिलींदनगर, ह.मु. साईनगर, परळी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून त्यांच्यावर चाकूने वार केला. यात त्यांच्या डाव्या हातावर आणि पोटावर जखमा झाल्या.
जखमी अवस्थेत त्यांनी उपचारासाठी परळी वैजनाथ येथील सरकारी दवाखान्यात दाखल होऊन उपचार घेतले. उपचारानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा उशिरा नोंदविण्यात आला.
या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि ठाकुर करीत आहेत.