Breaking
Updated: सप्टेंबर 16, 2025
जुन्या अपघातातील पैशांच्या वादातून शेतकऱ्यावर चाकू हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारूर : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या पोटात चाकू खुपसून खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना धारूर कसबा विभागात घडली. गंभीर जखमी अवस्थेत पत्नीला अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सारिका महादेव कानमोडे (रा. गणपती मंदिराजवळ, कसबा विभाग, धारूर) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. सारिका यांनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांचा पती महादेव सुभाष कानमोडे याचे पंक्चर दुकान आहे. दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11.30 वाजता त्या घरी झोपलेल्या असताना पती महादेव याने संशय घेत घरगुती वादातून त्यांच्यावर धारदार चाकूने पोटावर छातीखाली वार केला.
अचानक झालेल्या या हल्ल्यात सारिका कानमोडे गंभीर जखमी झाल्या. त्यांनी आरडाओरड केल्यावर आरोपी पती पळून गेला. त्यानंतर जखमीने भावाकडे धावत जाऊन मदत मागितली. शेजारी आकाश मोरे व आदित्य मोरे यांनी तातडीने स्कूटीवर बसवून सरकारी दवाखाना धारूर येथे दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या प्रकरणी पती महादेव सुभाष कानमोडे याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.