Breaking

जुन्या वैमनस्यातून प्राणघातक हल्ला; दोन जखमी, आठ जणांविरोधात गुन्हा

Updated: सप्टेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

डोळ्यात चटणी टाकून महिलेचा विनयभंग ; पीडितेसह नातेवाईकांना मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : तालुक्यातील बनसारोळा येथे जुन्या भांडणाचा राग धरून गावातील आठ जणांनी एका शेतकरी आणि त्याच्या भावावर लोखंडी रॉड, पाईप व काठीने प्राणघातक हल्ला केला.. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अशोक सुर्यकांत काकडे (वय ३४, व्यवसाय शेती व बिल्डिंग मटेरियलचे दुकान, रा. बनसारोळा) यांनी याबाबत फिर्याद दिली. दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानासमोर मधुकर काकडे, सुलभा काकडे, अजय काकडे, त्रीबंक काकडे, सुधाकर काकडे, माधुरी काकडे सर्व रा. बनसारोळा व दोन अनोळखी व्यक्तींनी जुन्या भांडणाच्या रागातून हल्ला केला.

आरोपींनी लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, प्लास्टिकचा टिकाव दांडा व काठ्यांनी वार करत फिर्यादी अशोक काकडे व त्यांचे बंधू आदित्य काकडे, ज्ञानेश्वर काकडे यांना मारहाण करून शिवीगाळ केली. यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. माजरे करत आहेत.


Categories

Recent Posts