Breaking
Updated: सप्टेंबर 13, 2025
भरधाव टेम्पोच्या धडकेत मजुराचा मृत्यू, जनावरेही ठार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – शेतातून दुधाचे कँड घेऊन घराकडे पायी निघालेल्या वृद्ध शेतकऱ्यास दुचाकीने धडक दिल्याने या अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना होळ (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
होळ (ता. केज) येथील तुकाराम नरसोबा खाडे (वय ७०) हे ७ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास शेतातून दुधाचे कँड घेऊन घराकडे पायी निघाले होते. रस्त्याच्या बाजूने चालत असताना दुचाकी चालक विकास धायगुडे (रा. लखमापूर ता. रेणापूर जि. लातूर) याने दुचाकी (एम. २४ बीटी ७६७५) हलगर्जीपणाने व निष्काळजीपणाने भरधाव वेगात चालवून त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात तुकाराम खाडे हे तोंडावर पडल्याने जबड्यास व कपाळास मार लागला. तर त्यांचा उजवा पाय घोटा आणि पिंडरीमध्ये फॅक्चर झाला. त्यांच्यावर लातूरच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुकाराम खाडे यांच्या जबाबावरून दुचाकी चालक विकास धायगुडे याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार अनिल बिक्कड हे करीत आहेत.