Breaking

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जखमी

Updated: सप्टेंबर 13, 2025

By Vivek Sindhu

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने या अपघातात दुचाकीचा चालक गंभीर जखमी होऊन मरण पावला. तर पाठीमागे बसलेले एक जण जखमी झाल्याची घटना केज – मांजरसुंबा रस्त्यावरील सावंतवाडी फाट्यावर शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. विशाल किसन चाळक (वय २३) असे अपघातात मरण पावलेल्या दुचाकी चालक तरुणाचे नाव आहे. दरम्यान, अपघातानंतर पळून जात असलेल्या ट्रक चालक आयुब मोहम्मदखॉन पठाण (रा. महाराणा प्रताप नगर, म्हाडा कॉलनी, लातुर) यास पाठलाग करून ट्रकसह पकडले.
उमरी येथील हॉटेल चालक विशाल किसन चाळक (वय २३) व महावीर गोरोबा मुळे (वय ४१) हे सावंतवाडी येथे गेले होते. परत शुक्रवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एम. एच. ४४ एबी ६५४२) गावाकडे निघाले असता केज – मांजरसुंबा रस्त्यावरील सावंतवाडी फाटा येथे त्यांच्या गावातील बळीराम नरशिंग भैरट व दत्तात्रय सुधाकर भैरंट हे दोघे रस्त्याचे कडेला उभे असल्याचे दिसल्याने त्यांना थांबून विचारणा करीत होते. त्याचवेळी मस्साजोगकडून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (के. ए. ५६ – ५४३९) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात विशाल चाळक याच्या डोळ्याच्या भुवईवर, उजव्या पायाचे पिंडरीला, पंजाला व डाव्या पायाचे पंजाला गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडला. तर महावीर मुळे यांना जबड्याला, डोक्याला, पायाला, हाताला, कमरेला, गुडघ्याला मार लागून जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयास दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून विशाल चाळक यास मृत घोषित केले. महावीर मुळे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक आयुब पठाण याच्याविरुद्ध केज पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार प्रल्हाद चव्हाण हे करीत आहेत.


Categories

Recent Posts