Breaking
Updated: सप्टेंबर 12, 2025
सालगडी शेतमालकाच्या घरातून ४० हजार रुपये घेऊन फरार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपाटोदा – चुंबळी फाटा येथे एका दुकानदाराला धमकी देत १० हजार रुपये रोख व मोबाईल असा १५ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी पाटोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद अब्रुचा भवर (वय १९, रा. माऊलीनगर, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आरोपी गणेश महादेव गर्ज (रा. महासांगवी, ता. पाटोदा) हा त्यांच्या चष्म्याच्या टपरीवर आला. त्याने “मला खर्चाला पैसे नाहीत” असे सांगत फिर्यादीच्या खिशातील १० हजार रुपये व रेडमी कंपनीचा अंदाजे ५ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर आरोपीने “तू तुझे दुकान बंद कर, नाहीतर पुन्हा येऊन मारहाण करीन” अशी धमकी दिली.
या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८३/२०२५ नोंदवण्यात आला असून भा.न्या.सं. २०२३ चे कलम १९१, ११९(१), ११५(२), ३२४(२), ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.