Breaking
Updated: सप्टेंबर 11, 2025
गळा दाबून शेतमजुराच्या पत्नीवर केला बलात्कार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – एका शेतमजुराच्या पत्नीचा गळा दाबून शेजाऱ्याने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना केज शिवारात घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात एक शेतमजूर कुटुंब वास्तव्यास असून हे कुटुंब शेतातील कामे करून उपजीविका भागविते. ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शेतमजुराची २८ वर्षीय पत्नी घरातील भांडे घाशीत होती. तर तिचा पती बाहेर गेला होता. त्यावेळी तिच्या ओळखीचा लक्ष्मण ससाणे हा तिथे आला. त्याने अगोदर तिच्या नवऱ्याची चौकशी केली. तिचा नवरा घरी नाल्याची संधी साधून त्याने वाईट हेतूने तिचा हात धरला. एका हाताने तिचा गळा आवळून घरातील बाजेवर पाडून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करून निघून गेला. काही वेळाने पीडित महिलेचा पती घरी आल्यानंतर तिने तिच्यावरील झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. १० सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून लक्ष्मण ससाणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.