Breaking
Updated: सप्टेंबर 11, 2025
डोळ्यात चटणी टाकून महिलेचा विनयभंग ; पीडितेसह नातेवाईकांना मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – दुचाकीवरून जात असलेल्या ऊसतोड मुकादमाच्या हातातील चार लाख रुपयांची रक्कम असलेली पिशवी हिसकावून नेल्याची घटना केज – अंबाजोगाई रस्त्यावरील सरकारी दवाखान्याजवळ २९ जुलै रोजी घडली होती. या प्रकरणातील दोघांना परभणीच्या कारागृहातून केज पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
केज तालुक्यातील मानेवाडी येथील उत्तरेश्वर उत्तम धायगुडे व त्यांचे मेव्हणे रमेश वैजेनाथ माने यांनी अंबाजोगाई येथील आयडीबीआय बँकेतून चेकद्वारे चार लाख रुपयांची रक्कम काढून कॅरीबॅगमध्ये ठेवून केजला आले. येथील अंबाजोगाई रस्त्यागरील एसबीआय बँकेत आरटीजीएस गेले. मात्र त्यांना उशीर झाल्याने बँकेचे व्यवहार बंद झाल्याने परत गावाकडे जात असताना दुपारी ४.३० वाजेच्या उपजिल्हा रुग्णालयाजवळ पाठीमागून भरधाव वेगात दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी उत्तरेश्वर धायगुडे यांच्या हातातील चार लाख रुपये असलेली पांढऱ्या रंगाची कॅरीबॅग हिसकावून अंबाजोगाईच्या दिशेने निघून गेले होते. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
केज पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दोघांकडून पोलीस तपासात इतर गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.