Breaking
Updated: सप्टेंबर 8, 2025
अंभोर्यात भरदिवसा घरफोडी, चांदीची चैन व रोख रक्कम लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी : तालुक्यातील बोरोडी शिवार येथे शनिवारी दुपारी झालेल्या घरफोडीत अज्ञात आरोपींनी चांदीची चैन व रोख रक्कम असा एकूण सात हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालिंदर यादवराव शेंडगे (वय ६२, रा. बोरोडी, ता. आष्टी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते सव्वा तीन वाजेच्या दरम्यान फिर्यादी व त्यांची पत्नी किराणा आणण्यासाठी गावात गेले होते. यावेळी आरोपी शिशीर दिलीप भोसले (रा. थेरगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), राजु उर्फ राजविर अनिल काळे, अमोल अनिल काळे (दोन्ही रा. कुंभळी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी घराच्या दरवाज्याचा कोंडा तोडून घरात बेकायदेशीर प्रवेश केला. घरातून फिर्यादीच्या पत्नीची दोन पट्ट्याची चांदीची चैन (किंमत २००० रुपये) आणि पायजम्यातील खिशात ठेवलेले रोख पाच हजार रुपये असा एकूण सात हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. तसेच शेजारील साक्षीदाराच्या घराचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न आरोपींनी केला.
या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना देवकर करीत आहेत.