Breaking
Updated: सप्टेंबर 5, 2025
अल्पवयीन मेव्हणीचा विनयभंग ; बहिणीच्या पतीविरुद्ध गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – आपसात पटत नसल्याने पत्नी माहेरी असताना एका तरुणाने आपल्या सासऱ्याच्या घरात घुसून अल्पवयीन मेव्हणीचा विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील तरुणाची पत्नी ही आपसात पटत नसल्याने माहेरी राहते. त्याच्या गावापासून जवळच असलेल्या सासुरवाडीत जाऊन संबंधित तरुणाने सासू सासरे घराबाहेर झोपल्याची संधी साधून घरात एकटीच झोपलेल्या अल्पवयीन मेव्हणीचा घरात घुसून विनयभंग केला. पीडित मेव्हणीने आरडाओरडा करण्याची धमकी देताच संबंधित तरुणाने हा प्रकार कोणाला सांगितल्यास गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देत घरातून निघून गेला. त्यानंतर सासू सासऱ्याने त्याच्या घरी जाऊन जाब विचारला असता त्यांना संबंधित जावई व त्याच्या आईने कोठे आरोप करू नका, असे म्हणत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार पीडित मुलीच्या आईने दिल्यावरून जावई व त्याच्या आईविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.