Breaking
Updated: सप्टेंबर 5, 2025
नाचल्याने चक्कर येऊन मराठा तरुणाचा मृत्यू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – मुंबईचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर विजय उत्सव मिरवणुकीत नाचल्यानंतर चक्कर येऊन एका २० वर्षीय मराठा तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील बेंगळवाडीत घडली.
मुंबई येथील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मराठा आंदोलक गावी परत आल्यानंतर गाव पातळीवर गुलाल उधळून विजय उत्सव साजरा केला. तर केज तालुक्यातील विडा गावाजवळ असलेल्या बेंगळवाडीतील युवकांनी गावातील सप्ताहामुळे दुसऱ्या दिवशी गुरुवारी रात्री गावात विजय उत्सव मिरवणूक काढली. या मिरवणुकीत अती आनंदाने भारावून गेलेल्या विष्णू रोमन (वय २०) या तरुणाने मित्रासोबत उल्हासित होऊन नाचला. अंगाने अत्यंत सडपातळ व अशक्त शरीर असलेला विष्णू रोमन याला नाचल्यानंतर चक्कर आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अत्यंत सामान्य व गरीब परिस्थिती असलेल्या विष्णूच्या निधनाने त्याचे आई, वडील व कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.