Breaking

परळीत तरुणाकडून धारदार तलवार जप्त

Updated: सप्टेंबर 3, 2025

By Vivek Sindhu

परळीत तरुणाकडून धारदार तलवार जप्त

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी : शहरातील हनुमान नगर चौक येथे बेकायदेशीररीत्या धारदार तलवार बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12.50 वाजता करण्यात आली.

फिर्यादी पोना रुपेश दिपकराव शिंदे (वय 32, पोलीस ठाणे परळी शहर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हनुमान नगर चौकात एक इसम तलवार घेऊन फिरत आहे. त्यानंतर पोलिस निरीक्षक नाचण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दोन पंचांसह छापा टाकला. त्यावेळी हातात लोखंडी तलवार घेऊन फिरत असलेला एक तरुण दिसला. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव रवि रामकिसन सुरवसे (वय 24, रा. हनुमान नगर, परळी वै.) असे सांगितले. त्याच्या ताब्यातून 31 इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.
या प्रकरणी आरोपी रवि रामकिसन सुरवसे याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत.


Categories

Recent Posts