Breaking
Updated: ऑगस्ट 31, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यात निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या (१ सप्टेंबर) ओबीसी समाजातील हालचालींना वेग मिळणार आहे. ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची तातडीची बैठक मुंबईत बोलावली असून, या बैठकीत मराठा आरक्षणाचे संभाव्य परिणाम आणि ओबीसी समाजाची भूमिका यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
या बैठकीनंतर ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेतून ओबीसी समाजाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विशेषतः हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि औंध गॅझेट यासंदर्भात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दाखवत ओबीसींची बाजू मांडली जाणार आहे.
मराठा आरक्षणाच्या चळवळीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असताना, ओबीसी समाजाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेते कोणते मुद्दे मांडतात, हे पाहणे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
एकूणच, उद्याची बैठक आणि पत्रकार परिषद मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्षाला नवे वळण देणारी ठरू शकते, अशी चिन्हे दिसत आहेत.