Breaking

सातारा पोलिसांवर हल्ला करणारा लखन भोसले एन्काऊंटरमध्ये ठार

Updated: ऑगस्ट 30, 2025

By Vivek Sindhu

4ca621f2d2cba687c60f7a4eb92bee761756566408472339 original

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

सातारा : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे जबरी चोरी प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या सातारा पोलिसांवर हल्ला झाला. या हल्ल्यात सातारा पोलीस (satara police) दलातील चार पोलिस गंभीर जखमी झाले असून, प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी आरोपीचा एन्काऊंटर (encounter) केला. लखन भोसले असे ठार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी लखन भोसले हा पोलिसांना हवा होता. त्याच्यावर सातारा आणि सांगली जिल्ह्यात जबरी चोरी, दरोडे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. दोन दिवसांपूर्वी महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून तो फरार झाला होता.

या घटनेनंतर सातारा पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत शिक्रापूर येथे गेले असता लखन भोसलेने पोलिसांवर हल्ला केला. चाकू व दगडाने केलेल्या हल्ल्यात चार पोलिस जखमी झाले. आत्मसंरक्षणार्थ पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि त्यात लखन भोसले ठार झाला.

या कारवाईमुळे सातारा पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात येत असून, जिल्हाभरात या घटनेची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


Categories

Recent Posts