Breaking

परळीत सलून व्यावसायिकावर हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Updated: ऑगस्ट 29, 2025

By Vivek Sindhu

नेकनूरात दोन बिअर बार फोडून ५२ हजारांचा मुद्देमाल लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी : वडसावित्री नगर परिसरात जुन्या भांडणाच्या कुरापतीतून एका सलून व्यावसायिकावर लाकडी दांडा, वीट व चापटाबुक्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सलून व्यावसायिक योगेश सतिश गवळी (वय ३१,. वडसावित्री नगर, परळी वै.) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास आरोपी पवन मोरे, सोमनाथ मोरे आणि पवन मोरे यांची आई (नाव माहिती नाही, सर्व रा. वडसावित्री नगर, परळी वै.) यांनी संगनमत करून हल्ला केला.

वाद वाढताच पवन व सोमनाथ मोरे यांनी लाकडी दांडा व विटेने गवळी यांच्या मानेवर व पायाच्या बोटावर मारहाण करून जखमी केले. त्याचवेळी पवन मोरेच्या आईने फिर्यादीच्या आईचे केस पकडून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी हल्ला केला.

या प्रकरणी परळी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दराडे करत आहेत


Categories

Recent Posts