Breaking

धारूरमध्ये शेतकऱ्याला लुटले; रोकड व फोनपेवरून पैसे लंपास

Updated: ऑगस्ट 29, 2025

By Vivek Sindhu

रोकड व फोनपेवरून पैसे लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर : येथील मैदवाडी चौकात शेतातून घरी येणाऱ्या शेतकऱ्यावर दोन अनोळखी इसमांनी हल्ला करून रोकड व ऑनलाईन व्यवहाराद्वारे पैसे काढून नेल्याची घटना घडली आहे.

भरत भगवानराव बसवर (वय ३९, रा. जाधव गल्ली, धारूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ ऑगस्टच्या रात्री साडेदहाच्या सुमारास ते घरी परतत असताना मैदवाडी चौकात दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. या इसमांनी फिर्यादीला बेल्ट व टिफिन डब्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील ४६७० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. एवढेच नव्हे तर फिर्यादीच्या फोनपे खात्यातून DP4U सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे ५००० रुपये काढून घेतले. त्याचवेळी आरोपींनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली.

या प्रकरणी अज्ञात दोन इसमांविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Categories

Recent Posts