Breaking
Updated: ऑगस्ट 29, 2025
आष्टीत क्रिकेटच्या वादातून हाणामारी, तरुणाचे दात फोडले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी : तालुक्यातील धनगरवाडी येथे क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एका तरुणावर दगडाने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी देविदास नवनाथ खुरंगे (वय ३१, रा. धनगरवाडी, ता. आष्टी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास बाळु मामाच्या मंदिराजवळ क्रिकेट सामन्यादरम्यान त्यांचा आरोपी कृष्णा भैरव खुरंगे (रा. धनगरवाडी, ता. आष्टी, जि. बीड) याच्याशी वाद झाला. वाद वाढताच आरोपीने फिर्यादीवर दगडाने हल्ला केला. यामध्ये फिर्यादीच्या दात पडले आणि ओठाला जखम झाली. तसेच हातालाही दगड लागून दुखापत झाली. त्यानंतर शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली.
सदर फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक देवकर करत आहेत.