Breaking

परळी बसस्थानकाजवळ तरुणावर हल्ला; दोन जणांविरुद्ध गुन्हा

Updated: ऑगस्ट 26, 2025

By Vivek Sindhu

marhan

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी : शहरातील बस स्थानक परिसरात एका मजुरावर बिअर बाटलीने वार करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी दिनेश बुडाप्पा देवकर (वय 25, रा. वडार कॉलनी, परळी) हे 24 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून साडेअकराच्या सुमारास बस स्थानकावरील फड यांच्या चहाच्या टपरीसमोर चहा घेत होते. त्या वेळी आरोपी संभाजी चव्हाण आणि राजु चव्हाण (दोघे रा. वडसावित्रीनगर, परळी) यांनी संगनमताने फिर्यादीकडे जाऊन त्यांचा कॉलर पकडला.

दिनेशने विरोध केल्यावर आरोपी संभाजी चव्हाण यांनी हातातील बिअरची बाटली त्याच्या डोक्यात व डाव्या डोळ्याजवळ मारली. तर दुसरा आरोपी राजु चव्हाण यांनी फिर्यादीला खाली पाडून चापटा-बुक्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

या घटनेनंतर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सफौ दराडे करीत आहेत.


Categories

Recent Posts