Breaking
Updated: ऑगस्ट 20, 2025
दगडवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपाटोदा : तालुक्यातील गांधनवाडी (जगताप वस्ती) येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ४७ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशोक बाबासाहेब जगताप (रा. गांधनवाडी, ता. पाटोदा) यांच्या घरात १९ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता चोरी झाली. चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरातील ऐवज लंपास केला. यात ५ ग्रॅम वजनाची सोन्याची नक्षीदार अंगठी (किंमत ३५ हजार रुपये), ५०० रुपयांच्या २० नोटा मिळून १० हजार रुपये रोकड, तसेच २ हजार रुपये किंमतीची चांदीची जोडवी व पैंजण असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.
या प्रकरणी अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार डोंगरे करीत आहेत.