Breaking
Updated: ऑगस्ट 14, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelनवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवर वारंवार प्रवास करणाऱ्या खासगी वाहनचालकांना टोल प्लाझावर वारंवार पैसे देण्याच्या त्रासातून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जाहीर केलेला FASTag Annual Pass 15 ऑगस्ट 2025 पासून देशभरात लागू होणार आहे. हा पास विद्यमान FASTag इन्फ्रास्ट्रक्चरवरच चालणार आहे, त्यामुळे नव्याने टॅग खरेदी करण्याची गरज नाही.
या योजनेअंतर्गत कार, जीप आणि व्हॅनसारख्या नॉन-कमर्शियल वाहनांसाठी केवळ 3 हजार रुपयांत एका वर्षासाठी किंवा 200 टोल क्रॉसिंगपर्यंत प्रवासाची मुभा मिळणार आहे. 200 टोल क्रॉसिंग आधीच पूर्ण झाले, तर पासची मुदत संपेल आणि नवा पास घ्यावा लागेल.
हा पास केवळ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्ग व एक्सप्रेस-वेवरच लागू राहील. पास सक्रिय करण्यासाठी वाहन आणि त्याच्याशी जोडलेल्या FASTag चा व्हेरिफिकेशन आवश्यक आहे.
पास खरेदीसाठी वाहनधारकांनी ‘राजमार्ग यात्रा’ मोबाईल अॅप किंवा NHAIच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन वाहन नोंदणी क्रमांक (VRN) व FASTag आयडी वापरून लॉगिन करावे. Annual Pass पर्याय निवडून 3 हजार रुपयांचे पेमेंट UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे करावे. पेमेंट आणि व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर पास थेट विद्यमान FASTag शी जोडला जाईल.
यामुळे वारंवार लांब पल्ल्याच्या प्रवास करणाऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.