Breaking
Updated: ऑगस्ट 12, 2025
सौताडा येथे मंदिरात तरुणीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपाटोदा : तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर मंदिरात दर्शनाला आलेल्या तरुणीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना रविवारी (दि. ११ ऑगस्ट) दुपारी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा दादासाहेब दहिफळे (वय २६, रा. कुत्तरवांडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) या दुपारी सुमारे २ वाजता रामेश्वर मंदिर, सौताडा येथे आल्या होत्या. दर्शनादरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम ५० मिली वजनाचे सोन्याचे मिनी गंठण (किंमत सुमारे १ लाख ४० हजार रुपये) चोरुन नेले.
या प्रकरणी सुवर्णा दहिफळे यांनी पाटोदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.