Breaking

दहिफळ (वड.) येथे महिलेस लोखंडी गज, काठीने बेदम मारहाण ; खांद्यावर फॅक्चर 

Updated: जून 19, 2026

By Vivek Sindhu

दहिफळ (वड.) येथे महिलेस लोखंडी गज, काठीने बेदम मारहाण ; खांद्यावर फॅक्चर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज  – मुलीला आंघोळ करताना स्लॅबवर चोरून पाहतो असा आरोप का केलास असे म्हणत एका ४६ वर्षीय महिलेस चौघांनी दगड, लोखंडी गज आणि काठीने बेदम मारहाण केल्याने खांद्यावर फॅक्चर झाले आहे. ही घटना केज तालुक्यात दहिफळ (वडमाऊली) येथे घडली असून याप्रकरणी चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल आहे. 

     दहिफळ (वडमाऊली) येथील सुमलबाई गोरख गदळे ही महिला आपल्या दोन मुलीसह ७ जून रोजी सकाळी ७.४५ वाजता घरी असताना घरासमोर राहणारे अशोक रामदास गदळे, कार्तिक रामदास गदळे, रामदास अभिमान गदळे, ओमकार सुधाकर गदळे हे चौघे घरात आले. त्यांनी या महिलेस तु काल कार्तिक हा स्लॅबवर जाऊन मुली आंघोळ करीत असताना चोरून पाहतो, असा आरोप का केलास असे कारण काढून शिवीगाळ केली. त्यांना शिव्या देऊ नका असे त्या म्हणाल्या असता अशोक याने दगड सुमलबाई यांच्या हाताचे मनगटावर मारून जखमी केले. कार्तिक याने लोखंडी गज खांद्यावर मारला. तर रामदास याने काठीने मानेवर, पाठीवर, मांड्यावर मारहाण केली. त्यांची मुलगी ही मारहाण होत असल्याचे पाहून मोठ्याने वाचवा – वाचवा असे म्हणत असताना तिला ओमकार याने लाथाबुक्याने मारहाण केली. तुम्ही परत आमच्या नादी लागलात, तर जिवे मारू अशा धमक्या दिल्या. नांदूरघाट व केज येथील शासकीय रुग्णालयात सुमलबाई गदळे यांच्यावर प्रथमोपचार उपचार करून बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचा मारहाणीत खांद्यावर फॅक्चर झाले आहे. त्यांच्या जबाबावरून अशोक गदळे, कार्तिक गदळे, रामदास गदळे, ओमकार गदळे या चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार राजू वंजारे हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts