Breaking

हिवरापहाडी येथून दोन शाळकरी मुलांचे अपहरण; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Updated: जून 19, 2026

By Vivek Sindhu

हिवरापहाडी येथून दोन शाळकरी मुलांचे अपहरण; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: तालुक्यातील हिवरापहाडी येथून दोन १५ वर्षीय शाळकरी मुलांचे अज्ञात कारणास्तव अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिवरापहाडी येथील रहिवासी भागवत वामन आगलावे यांचा मुलगा विनायक भागवत आगलावे आणि त्याचा मित्र रितेश जालीधर आगलावे हे दोघे १७ जून रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शाळेत जातो असे सांगून घरातून निघाले होते. मात्र, संध्याकाळ झाली तरी ते दोन्ही मित्र घरी परतले नाहीत. त्यामुळे काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी त्यांची गावात, नातेवाइकांकडे आणि मित्रांकडे शोधमोहीम सुरू केली. पालकांनी शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधला असता, ती दोन्ही मुले त्या दिवशी शाळेत आलीच नसल्याचे समोर आले. सर्वत्र शोध घेऊनही मुलांचा काहीही पत्ता न लागल्याने, अज्ञात व्यक्तीने काहीतरी कारणाwrapper अज्ञात हेतूने मुलांचे अपहरण केल्याची तक्रार वडिलांनी पोलिसांत दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस हवालदार वनवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts