Breaking

वाळूची वाहतूक करताना टिप्पर पकडला

वाळूची वाहतूक करताना टिप्पर पकडला

आष्टी – तालुक्यातील तलवार फाटा येथून टिप्परच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच बुधवार (दि.१८)रोजी कारवाई करत १,६२००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा सपाटा सुरू आहे.त्यात आष्टी तालुक्यातील तलवार फाटा येथून टिप्परच्या साहाय्याने अवैध वाळूची करताना रामहरी सयाजी आटपाले (वय ३२) रा. ब्रम्हगाव ता.आष्टी जि.बीड यांच्या आष्टी पोलिसांनी (दि.१८)रोजी कारवाई केली.यात एक टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक एमएच १४ एस ८१४९ अंदाजे किंमत १५,०००० रुपये व त्यामध्ये तीन ब्रास वाळू अंदाजे किंमत १२,००० रुपये असा एकूण १,६२००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास आष्टी पोलीस करत आहेत.

Last Updated: June 19, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

Share This Post

ग्रुप जॉईन करा