Breaking

कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा अन्यथा कठोर निर्णय

Updated: July 2, 2025

By Vivek Sindhu

संतोष देशमुखांच्या भावाचा निर्वाणीचा इशारा

WhatsApp Group

Join Now

संतोष देशमुखांच्या भावाचा निर्वाणीचा इशारा

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा मारेकरी कृष्णा आंधळे मागील 204 दिवसांपासून फरार आहे. त्याला तत्काळ अटक केली नाही तर आम्ही कठोर निर्णय घेऊ, असा निर्वाणीचा इशारा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बुधवारी सरकार व पोलिस प्रशासनाला दिला.

संतोष देशमुख यांची गतवर्षी 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणी माजी मंत्री धनंजय देशमुख यांचा राईट हँड समजल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण कृष्णा आंधळे नामक आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. तो जवळपास 204 दिवसांपासून फरार आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बुधवारी तीव्र रोष व्यक्त केला. तसेच पोलिस व सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 6 महिने लोटलेत. पण या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याला तत्काळ अटक करा. त्याच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे. त्याला अटक झाली नाही तर मी लवकरच कठोर निर्णय घेईल. त्यानंतर जे होईल त्याला प्रशासन जबाबदार असेल, असे ते म्हणाले.

कुटंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न

प्रस्तुत प्रकरणाची बीड कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुनावणीच्या दिवशी आरोपींचे समर्थक व सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे पक्षचिन्ह असलेल्या गाड्या मोठ्या संख्येने आणून दहशत पसरवण्याचा व आमच्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातील आरोपींना बीड कारागृहात व्हिआयपी सुविधा मिळत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना वेळोवेळी इतर तुरुंगात हलवण्याची मागणी केली. पण त्यावर काहीही झाले नाही. सर्व आरोपी एकाच जेलमध्ये आहेत.

इतर प्रकरणांतील आरोपी तत्काळ जेरबंद होता. पण देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी 204 दिवसांपासून फरार आहे. त्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा. आमच्या मागणीची गंभीर दखल घ्यावी, असेही धनंजय देशमुख यावेळी बोलताना म्हणाले.