Breaking
Updated: July 2, 2025
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई.. (प्रतिनिधी ) – ज्येष्ठांच्या वयाप्रमाणे त्यांच्या प्रकृती मध्ये अनेक बदल घडून येतात. म्हणून ज्येष्ठांनी आपली तपासणी दरवर्षी करून घेणे आवश्यक आहे.
असे उद्गार ज्येष्ठ शैल्य चिकित्सक डॉक्टर डावळे यांनी जेष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई ्यांनी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात व्यक्त केले.
. वयाच्या साठी नंतर शरीरातील रक्तदाब, मधुमेह, दंत, नेत्र,कांन,हाडे, हृदय, स्नायू व त्वचा वर परिणाम होत असतो म्हणून तज्ञा कडून तपासणी करून व वेळीच विलाज करणे आवश्यक आहे. असे मार्गदर्शन व्यंकरराव डावळे प्रतिष्ठान चे संचालक जेष्ठ शल्य चिकित्सक डॉ. अरुणराव डावळे ्यांनी जेष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई च्या मासिक सभेत केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अनंतराव जगतकर होते तर या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून जेष्ठ नागरिक संघ केजचे सचिव गदळे सर व कोषध्यक्ष रामेश्वर जाजू होते तर व्यासपीठावर थोरात सर, पुंडलिक पवार शिवाजी शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात प्रार्थनेने तर शेवट राष्ट्रागानाने झाला, संचालन पुष्पा बागडे ्यांनी प्रस्तावना अनंतराव जगतकर ्यांनी तर आभार ज्ञानोबा कुकडे ्यांनी मानले. बैठकीत जून महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.