Breaking

नीट पेपरफुटी विरोधात धरणे आंदोलन

Updated: मे 29, 2026

By Vivek Sindhu

नीट पेपरफुटी विरोधात धरणे आंदोलन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – नीट यूजी २०२६ परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारुन आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली.
नीट यूजी २०२६ परीक्षेतील पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत, पैसा आणि मानसिक ताण सहन करून परीक्षा दिली असताना अशा प्रकारामुळे शिक्षण व्यवस्वेधरील विधास डळमळीत होत असल्याची भावना आंदोलनकरयांनी व्यक्त केली. या प्रकरणात संबंधित दोषीवर तात्काळ कठोर आणि पारदर्शक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रुटी दूर कराव्यात तसेन नीट परीक्षेचे नियोजन यूपीएससीकडे सोपवावे, तसेच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राज्यातील विविध भागांमध्ये घडलेल्या पेपरफुटीच्या घटनांची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ थांबवावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आंदोलकांनी केली. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रोहन मगर,उपाध्यक्ष प्रमोद निकाळजे,उमेश तुळवे, अजय सरवदे,किरण वाघमारे लखन जोगदंड व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.