Breaking

परळीत 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून लैंगिक अत्याचार

Updated: सप्टेंबर 9, 2025

By Vivek Sindhu

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आठ दिवसातील दुसरी घटना

बीड – जिल्ह्यातील परळी शहरात संतापजनक घटना घडली आहे. एका 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील बरकत नगर परिसरात राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केला असून यासाठी आणखी दोघांनी मदत केल्याचे समोर आले आहे. या घटनेने शहरात संताप व्यक्त केला जात आहे. आठ दिवसात ही दुसरी घटना परळी शहरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय पीडित मुलगी हीह आपल्या घराजवळ असताना आरोपींनी तिला फसवून नेले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यावेळी आणखी दोघांनी या आरोपींना साथ दिल्याचे तपासात समोर आले आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वीच रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा अशीच घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन मुख्य आरोपींवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतर दोघांवर त्यांना मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली आहेत. आरोपींना पकडण्यासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले असून, पोलिस लवकरच सर्व आरोपींना अटक करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

परळीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याची ही गेल्या आठ दिवसातील दुसरी घटना आहे. यामुळे पालकांमध्ये चिंता तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या गुन्हेगारीला कधी आळा बसणार? असा सवाल येथील नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.


Categories

Recent Posts