Breaking

केजमध्ये पुन्हा मोबाईल चोर सक्रिय

Updated: जून 5, 2026

By Vivek Sindhu

केजमध्ये पुन्हा मोबाईल चोर सक्रिय

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

रस्त्याने चालत असलेल्या महाविद्यालयीन युवतीचा मोबाईल हिसकावला

केज :- केज शहरात मोबाईल चोरणारे पुन्हा सक्रिय झाले असून एका दुचाकीस्वाराने, रस्त्याने मोबाईलवर बोलत पायी चालत असलेल्या महाविद्यालयीन तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेला आहे. 

या बाबतची माहिती अशी की, दि. ३ मे रोजी केज येथील लक्ष्मी मुंडे नर्सिंग कॉलेज मध्ये द्वितीय वर्षात शिकत असलेली कु. अंकिता वायबसे ही दुपारी ३:०० वा. च्या सुमारास पायी घरी येत होती. ती केज बीड रोडवर असलेल्या बीएसएनएल कार्यालयाच्या जवळ तिच्या मावशीला फोनवर बोलत पायी चालत असताना, तिच्या पाठीमागून आलेल्या एका विनानंबरच्या दुचाकीस्वाराने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून गेला. त्या मोबाईल चोराने फिक्कट गुलाबी रंगाची हुडी घातलेली असून त्याच्या डोक्यावर कॅप आहे. 

मोबाईल चोरीच्या घटने नंतर ती तरुणी तिच्या मावशी सोबत केज पोलिस ठाण्यात जाऊन तिने ठाणे अंमलदार गित्ते यांना माहिती दिली. 

दरम्यान अशा मोबाईल चोरीच्या घटनेमुळे महिला आणि मुलीमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिस सतर्क झाले आहेत.


Categories

Recent Posts