Breaking
Updated: June 22, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेज :- आई बाहेरगावी जात एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना केज शहरात घडली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज शहरातील बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची आई ही दि. १८ जून रोजी तिच्या नातेवाईकाकडे बाहेरगावी गेली होती. घरी तिचे वडील आणि दोन भाऊ व दोन बहिणी हे होते. रात्री सर्वांनी एकत्र जेवण करून झोपल्या नंतर मध्यरात्री साडेबारा वाजता तिच्या भावाने घरात पाहिले असता सदर अल्पवयीन मुलगी ही घरात नव्हती.
तिचा शोध घेऊनही ती आढळून आली नाही. मुलीच्या वडिलांच्या तक्रारी नुसार केज पोलीस ठाण्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले म्हणून गु. र. नं. ३२४/२०२५ भा. न्या. सं. ३३७ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे हे तपास करीत आहेत.