Breaking
Updated: ऑगस्ट 20, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा आणि नेकनूर पोलिसांनी मोठी कारवाई करत एक इंडीगो कार पकडली. वाहनातून तब्बल ४ किलो १४० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ४ लाख ५० हजार रुपये इतकी आहे.
बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चाकरवाडी-डिघोळअंबा रोडवर ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने नाकाबंदी केली असता पांढरी इंडीगो कार (क्र. MH-14-EH-1403) थांबवली. तपासणीदरम्यान दत्ता मधुकर भोजणे (रा. वाघे, बाभुळगाव) हा आरोपी वाहनातून आढळून आला. कारमध्ये ४ किलो १४० ग्रॅम गांजा सापडला.
या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २२८/२०२५ कलम २०(ब), ८(क) अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा बीड आणि नेकनूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सपोनि चंद्रकांत गोसावी, पोउपनि महेश विघ्ने, पोहवा महेश जोगदंड, जफर पठाण, भागवत शेलार, दिपक खांडेकर, बप्पासाहेब घोडके तसेच इतर पथकातील पोलिसांनी केली.